Ad will apear here
Next
चला नाती जपूया...
रक्ताचे नाते हे जन्मतःच तयार होते; मात्र आयुष्यात अशी अनेक नाती असतात जी नकळत निर्माण होतात. रक्ताच्या नातेसंबंधातही मैत्रीचे, विश्वासाचे नाते असेल, तर ते जास्त दृढ होते. नात्याचे हे भावबंध जपणे आजच्या ‘मी व माझे कुटुंब’ या पलीकडे न पाहण्याची दृष्टी असलेल्या जगात खूप महत्त्वाचे असल्याचे कुमुदिनी भार्गव यांच्या ‘चला नाती जपूया...’मधील लेखांमधून सांगितले आहे.

माणूस जन्माला येतो तेव्हा त्याचे स्वतःचे अस्तित्व निर्माण होते. म्हणूनच आधी स्वतःचे स्वतःशी नाते घट्ट करणे आवश्यक असते, हा पहिला धडा यात आहे. कुटुंबातील विविध नात्यांची गुंफण आणि ती कायम ठेवण्यासाठी आवश्यक बाबी नमूद केल्या आहेत. आई-मुलगी, एकटे अपत्य-आईवडील, पती-पत्नी, भावंडे, सासू-सून, नणंद-भावजय अशा कौटुंबिक नात्याचे पदर उलगडले आहेत. या शिवाय दोन स्त्रियांमधील नाते, शेजारधर्म, वृत्तपत्र-वाचक, डॉक्टर-रुग्ण, पोलीस-जनता, देव-भक्त, ग्राहक-विक्रेता, नेता-जनता, मालक-नोकर, गुरु-शिष्य अशा सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक पातळीवरील नात्यांवारही प्रकाश टाकला आहे.

पुस्तक : चला नाती जपूया...
लेखक : कुमुदिनी भार्गव, 
प्रकाशक : निर्मल प्रकाशन
पाने : १२० 
किंमत : १५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZRQCC
Similar Posts
जरा येऊ का मनात! ‘जरा येऊ का मनात!’ या पुस्तकाचा परिचय...
कवी, लेखक जगदेव भटू यांना राष्ट्रीय समाजगौरव पुरस्कार जाहीर भिवंडी : नवी दिल्लीतील डॉ. विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशन तथा आदीलीला फाउंडेशन यांच्या वतीने कवी, लेखक जगदेव भटू यांना यंदाचा राष्ट्रीय समाजगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. १५ सप्टेंबरला नवी दिल्लीत अखिल भारतीय प्रतिभा साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते भटू यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
प्रेरणा आयुष्य सगळेच जण जगत असतात; पण ते रडत-कुढत जगायचे की हसत-खेळत हे प्रत्येकाच्या स्वभावावर व विचारांवर अवलंबून असते. म्हणूनच आनंददायी जीवनासाठी विनोद अ. बांदोडकर यांनी ‘प्रेरणा’ या पुस्तकातून केलेले लेखन मार्गदर्शक ठरते.
प्रेमातून प्रेमाकडे मैत्रीत वयाचे बंधन नसते; पण काहीवेळा समाजबंधन असते. विशेषतः मैत्री स्त्री-पुरुषामधील असेल, तर हे नाते नितळपणे सांभाळावे लागते. सार्वजनिक क्षेत्रातील थोरामोठ्यांचे अतिशय नाजूक संबंधातील मैत्र अरुण ढेरे यांनी ‘प्रेमातून प्रेमाकडे’मधून वाचकांपुढे उलगडले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language